भारतीय शास्त्रानुसार अन्न घटक
बारकाईने विचार केला तर असे लक्षात येते की
प्रत्येक अन्नघटक हा नि सर्गनिर्मि त आहे. ज्या नि सर्गा तून
सजीव जन्मा ला आले त्याच नि सर्गा तून हा आहारदेखील
जन्मा ला आला.
भारतीय शास्त्रां च्या सिद ् ध ांतानुसार ज्या पद् ध तीने
संपूर्ण विश्व हे पृथ्वी , आप, तेज, वायू व आकाश या
पाच तत्त्वां च्या एकत्रीकरणातून निर्मा ण होते, त्याच
पद् ध तीने या पाच तत्त्वां च्या कमी-अधिक प्रमाणात
एकत्रित येण्यानेच सृष्टी तील सर्व घटकांची निर्मि ती होते.
आपण आहारात वापरत असणारा प्रत्येक शाकाहारी
अथवा मांसाहारी पदार्थ याच पद् ध तीने पृथ्वी , आप,
तेज, वायू, आकाश या पाच महाभूतांपासून निर्मा ण होतो.
पाचही घटकांच्या एकत्रीकरणातून निर्मि ती झाली
असली तरीसुद् ध ा या पाचपैकी एका घटकाचे प्राबल्य या
आहार प्रकारात दिसते.
उदाहरणार्थ ,
गहू, ज्वा री
यांसारख्या कठीण पदार्थ ांत पार्थि व घटकाचे; फळे, दूध
यासारख्या पदार्थ ांत जलीय घटकाचे; तर आंबवलेल्या
पदार्था त वायू घटकाचे अधिक प्रमाण आपल्याला दिसून
येते.