पंचमहाभूते आणि षड् रस (चवी)
पाच महाभूतांपासून
पाच महाभूतांपासून तयार होणारा हा आहार संतुलि त
म्हणजेच
आहार संतुलि
कर्बोद के, प्रथि ने, स्नि ग्धपदार्थ , जीवनसत्त्वे ,
खनि जे, क्षार, पाणी यांनी युक्त असतो.
भारतीय आयुर्वेद
शास्त्रातही आहाराविषयक काही महत्त्वपूर्ण माहि ती
आपल्याला सापडते. यात षड् रसांचे (चवी) महत्त्वपूर्ण
वर्ण न केले आहे. रोजच्या आहारात मधुर म्हणजे गोड,
अाम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजेच खारट, ति क्त
म्हणजेच ति खट, कषाय म्हणजेच तुरट, कटू म्हणजेचकडू अशा सहा चवींचा समावेश असावा.
या चवींचे अन्नपदार्थ हेसुद् ध ा पंचमहाभूतांच्या
एकत्रीकरणातूनच तयार होतात.
उदा. मधुर रस - पृथ्वी व जल
आंबट - पृथ्वी व अग्नी
खारट - जल व अग्नी
कडू - -वायू व आकाश
ति खट - वायू व तेज
तुरट - वायू व पृथ्वी
षड् रसांचे कार्य
या चवींचे अन्नपदार्थ आपल्या आहारात रुची
निर्मा ण करण्याबरोबरच शरीरक्रिय ा व चलन-वलन
यासाठी सुद् ध ा मदत करतात. जसे की, गोड चवींचे पदार्थ
शरीराचे पोषण करणे, शरीर मजबूत करणे, ताकद वाढवणे
यासाठी उपयुक्त ठरतात. आंबट चवीचे पदार्थ हे रुची
निर्मा ण करणे, पचन करून पचनक्रिय ेचा वेग वाढवणे,
स्राव निर्मा ण करणे यांसारख्या क्रिय ांमध्ये मदत करतात.
खारट चवीचे पदार्थ अन्ना ला चव आणणे, शरीराची
स्त ब्धता दूर करणे, लठ् ठपणा कमी करणे, स्राव तयार
करणे यांसारख्या क्रिय ा करतात. ति क्त रस शरीरातील
अति रिक्त स्रावांचे शोषण करणारा, अन्न पचवणारा
शरीरातील जठराग्नी प्रज्वलि त करणारा असतो. कटू रस
हा अन्नपचनानंतर अन्ना चे शोषण करतो, अति रिक्त
स्नि ग्धता कमी करतो, अन्ना ला रुची प्रदान करतो. कषाय
म्हणजेच तुरट रस हा शरीरातील अति रिक्त स्राव शोषून
घेतो व मनाला तृप्त करतो. म्हणजेच थोडक्यात आहार
हा षड् रसात्मक म्हणजेच सहा चवींनी युक्त असावा.