ऋतूनुसार आहार
शरीरातील घटक पदार्थ ांची स्थि ती व बाहेरची
सतत बदलणारी परिस्थि ती यांच्यातील वि रोध टाळून,
सुसंवाद निर्मा ण करून, कायम निरामय अवस्था राहावी
यासाठी आयुर्वेदशास्त्रात ऋतुचर्या असा शास्त्र शुद्ध
वि चार मांडण्यात आला आहे. शरीराची स्वा स्थ्य अवस्था
टि कवण्यासाठी, रोग प्रति कारासाठी ज्याची आवश्यकता
भासेल ते मि ळावे, शरीराला नको असलेले घटक वाढले
असतील तर ते कमी व्हा वेत असा सर्व ांगीण वि चार करून
ऋतुचर्या वर्णन केली आहे. सूर्या भोवती पृथ्वी फि रत
असताना वेगवेगळे ऋतू तयार होतात.
भारतात प्रामुख्यान े
उत्तरायण म्हणजे जास्त उष्णता देणारा काळ आणि
दक्षिणायन म्हणजे कमी उष्णता देणारा काळ, असे दोन
कालखंड आहेत. या दोन कालखंडांना प्रत्येकी तीन
ऋतूंमध्ये वि भागण्यात आले आहे. यापैकी उत्तरायणामध्ये
शिशि र, वसंत, ग्रीष्म हे तीन ऋतू तर दक्षिणायन ात वर्षा ,
शरद, हेमंत हे तीन ऋतू येतात. यातील उत्तरायणात
शरीराची ताकद कमी होत असते त्यालाच आदान काल
तर दक्षिणायन ात शरीराची ताकद वाढते त्यालाच वि सर्ग
काळ ओळखले जाते. हा शास्त्रीय वि चार व्यवहारात
आणला तर शरीराचे स्वा स्थ्य अबाधि त राहते. ऋतूंतील
बदलांमुळे शरीरातील वात, पि त्त, कफ यांच्या स्थि तीत
बदल होऊन वेगवेगळे आजार निर्मा ण होण्याची दाट
शक्यता असते. वातावरणातील हा बदल सुसह्य
होण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न म्हणजेच ऋतूनुसार
आहार घेणे ही संकल्पन ा. ऋतूनुसार आहाराची शास्त्रीय
बैठक पि ढ्यान ् पि ढ्या पाळली जावी यासाठी आपल्या
पूर्वजांनी आहार ही कल्पन ा वेगवेगळ्या सण-उत्सव या
साच्यात बसवलेली दि सते. त्यामुळेच नकळत ति चे
पालन आहार संस्कृतीच्या माध्यमातून झालेले दि सते.