६. घटसर्प (Diphtheria)
घटसर्प (Diphtheria) | diphtheria-in-marathi-ghatsarp |
रोगाचे स्वरुप :
कॉर्नीबॅक्टेरियम डिप्थेरी नावाच्या जिवाणूच्या विषामुळे होणारा सांसर्गिक रोग म्हणजे घटसर्प होय. हा रोग सामान्यतः घसा, टॉन्सिल्स, स्वरयंत्र व नाक या अवयवांना होतो. क्वचित प्रसंगी त्वचेवरील जखमातही घटसर्प होऊ शकतो. ज्या ठिकाणी हया रोगाची बाधा होते त्या ठिकाणी करडया पांढरट रंगाचा ( greyish white) पडदा तयार होवून तो श्वसनसंस्थेच्या मार्गात पसरतो. कॉर्नीबॅक्टेरियम डिप्थेरी हया जिवाणूपासून होणारे विष रक्तात शोषले जाऊन त्याचा रुग्णाच्या •दयावर व मेंदूवर विपरित परिणाम होतो. प्रगत देशातून समुळ उच्चाटन झालेले असून भारतासारख्या विकसनशील देशातही सार्वत्रिक लसीकरणामुळे हया रोगाचे प्रमाण कमी झाले आहे. साथरोगशास्त्रीय घटक :
कारक:
कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी जिवाणूपासून होणारे विप.
संसर्गस्त्रोतः
घटसर्पाचा रुग्ण व वाहक.
सासर्गिक पदार्थः --
रुग्णाच्या नाक व घशातील स्त्राव.
संसर्गक्षम कालावधी :
१४ ते २८ दिवस
वयोगट :
२ ते ५ वर्षे वयोगटात जास्त प्रमाणात आढळतो.
प्रतिकारशक्ती :
मातेकडून मिळालेली प्रतिकार शक्ती जन्मानंतर काही महिनेच टिकते. प्रसार पध्दत : रुग्णाच्या शिंकण्या अथवा खोकल्याने निर्माण होणारे तुषार बिंदू, रुग्णाने वापरलेल्या वस्तू उदा. पेन्सील, खेळणी, कपडे इ. मार्फत हया रोगाचा प्रसार होतो. रोग लक्षणे : घसा दुखणे, घास गिळण्यास त्रास होणे, टॉन्सिल्स / घशात करड्या पांढरट रंगाचा पडदा तयार होणे, ताप येणे, मान व घशाला सूज येणे इ. लक्षणे दिसतात. स्वरयंत्राला घटसर्प झाल्यास श्वास गुदमरणे.
गुंतागुंत:
१. स्थानिक आरोग्य अधिका-यांना वर्दी देणे.
२. रुग्णाचे अलगीकरण करणे.
३. रुग्णाने वापरलेल्या वस्तूचे निर्जंतुकीकरण करणे ४. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व रोगक्षम लहान मुलांना लसीकरण करणे. तत्पूर्वी त्यांना ५०० ते १००० एकक एवढे घटसर्प प्रतिविष देणे. प्रतिबंधन : घटसर्पावरील लस किंवा त्रिगुणी लस देऊन बाळाचे लसीकरण करणे.
वयाच्या सहाव्या आठवडयापासून साधारणतः एक महिन्याचे अंतराने त्रिगुणी लसीच्या ०.५ मि.ली या प्रमाणात स्नायुमध्ये तीन मात्रा दिल्या जातात. तसेच दीड ते दोन वर्षादरम्यान व पाचव्या वर्षी बुस्टरची एक-एक मात्रा दिली जाते.
समाजातील लोकांना खालीलप्रमाणे आरोग्य शिक्षण / सल्ला द्यावा :
१.घटसर्प हा मुलांमधील गंभीर आजार आहे व त्यापासून मृत्यू होऊ शकतो.
२. त्रिगुणी लस देवून या रोगापासून पूर्ण बचाव होतो..
३. घटसर्प असलेल्या रुग्णापासून इतर लहान मुलांना दूर ठेवावे.
४. रुग्णाच्या नाक व घशातील स्त्रावाने दूषित झालेल्या वस्तूंचे निर्जं