क) पर्यावरण व्यक्तीच्या आरोग्यासाठी व समाजाच्या सुस्थितीसाठी आरोग्यदायक पर्यावरणाची नितांत आवश्यकता असते.
पर्यावरणाचे तीन प्रकार :
१. भौतिक पर्यावरणः- विविध रोगाचे मुख्य कारण दूषित पर्यावरण होय. उदा. दूषित पाणी व माती, निकृष्ट दर्जाची घरे, मानवी मैला व केरकच-याची अयोग्य विल्हेवाट.
जैविक पर्यावरण :- आजाराची कारणे आपणास जैविक पर्यावरणात सापडू शकतात. उदा. माशी, झुरळ, डास यासारखे कीटक तसेच उंदीर, कुत्रा यासारखे प्राणी निरनिराळ्या रोगांचा प्रसार करतात.
३. सामाजिक पर्यावरण:- धर्म, रुढी, परंपरा, सवयी, संस्कृती, सामाजिक लिंग भेद, शिक्षण, राहणीमान या सर्वांचा आपल्या आरोग्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे
बरा-वाईट परिणाम होतो.
कोणत्याही रोगाचा शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करावयाचा असल्यास यजमान, कारक व पर्यावरणांशी संबंधित असलेल्या सर्व घटकाचा अभ्यास करणे जरुरीचे असते. काही महत्वाच्या व्याख्या :
जंतूसंसर्ग : रोगकारक घटकाचा माणसाच्या किंवा प्राण्याच्या शरीरातील प्रवेश आणि तेथे त्यांची वाढ किंवा विकास म्हणजे जंतूसंसर्ग होय. जंतूसंसर्गाची परिणती कधी स्पष्ट रोगात तर कधी अस्पष्ट लक्षणात होते. उदा. एच आय व्ही संसर्ग झालेल्या व्यक्तीत सुरवातीच्या काळात कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाही. मात्र काही कालावधीनंतर शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे अनेक रोगलक्षणे स्पष्ट दिसू लागतात. सांसर्गिक आजार ( Communicable diseases) : विशिष्ट संसर्गजन्य घटक किंवा त्यांच्या विषामुळे होणारा आणि काही ठराविक परिस्थितीत समाजातील व्यक्तींमध्ये पसरणा-यारोगास सांसर्गिक किंवा संसर्गजन्य रोग म्हणतात.
असांसर्गिक आजार (Non-communicable-diseases) : या गटामध्ये कॅन्सर, रक्ताभिसरण संस्थेचे विकार, मधुमेह यासारख्या एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे संक्रमित न होणा-या रोगांचा समावेश होतो.
अधिशयन काळ (Incubation Period) : रोगकारक घटकाच्या शरीरातील प्रवेशापासून त्या विशिष्ट रोगाचे प्रथम लक्षण वा चिन्ह उद्भवेपर्यंतचा काळ म्हणजे अधिशयन काळ होय.
सातत्यपूर्ण आढळ (Endemic ) एखादया विशिष्ट प्रदेशात कमी प्रमाणात परंतु सातत्याने आढळणारा किंवा सामान्यपणे दिसणारा एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव म्हणजे सातत्यपूर्ण आढळ होय. भारतात सतत आढळणारे रोग म्हणजे विषमज्वर, अतिसार, हगवण, कावीळ, कुष्ठरोग, हत्तीरोग, हिवताप, क्षय इ. रोगाच्या वाढीस परिस्थिती पोषक असल्यास स्थानिक रोग फोफावून साथीच्या प्रमाणात विषमज्वर, हिवताप, बालपक्षाघात इ. आढळतात. उदा.
तुरळक आढळ (Sporadic) : तुरळकपणे एखादा रुग्ण आढळणे. तुरळक प्रमाणात एखाद्या रोगाचे आढळणे ही त्या रोगाच्या साथीची सुरुवात असू शकते. उदा. बालपक्षाघात (Polio ).
साथ (Epidemic) : सामान्य अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात एखाद्या रोगाचे रुग्ण समाजात
आढळल्यास समाजात त्या विशिष्ट रोगाची साथ आली असे म्हणतात. भारतात सामान्यपणे आढळणारे साथीचे आजार: गोवर, कांजण्या, कावीळ, पटकी, विषमज्वर,
मेंदूज्वर, एड्स होत.
विश्वव्यापी आढळ (Pandemic) जेव्हा एखाद्या रोगाची साथ एका देशापासून दुस-या जगभर पसरत चाललेली एड्स या रोगाची साथ पूर्वी विश्वव्यापी आढळ असलेले महत्वाचे रोग म्हणजे एन्फ्ल्यूएंझा, कॉलरा इ.
प्राणीजन्य रोग (Zoonosis ): पृष्ठवंशीय प्राण्यांपासून माणसाला होणा-या रोगांना प्राणीजन्य रोग म्हणतात. उदा. आलर्क, प्लेग, प्राण्यापासून होणारा क्षयरोग, कळपुळी इ.