ब) साथरोगशास्त्र (Epidemiology)
साथरोगशास्त्र (Epidemiology) |
मानवात आढळणारे विविध रोग, रोगप्रसार आणि त्यावर परिणाम करणा-या विविध घटकांच्या अभ्यासाला साथरोगशास्त्र म्हणतात. साथरोगशास्त्राच्या अभ्यासामुळे रोगांचा प्रसार कसा होतो आणि व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर नियंत्रण याबाबत परिपूर्ण आकलन होते तसेच रोग प्रतिबंधनात्मक कार्यक्रमाचे मूल्यमापन, गरजेनुसार त्यात सुधारणा करणे आणि आरोग्य सेवा सुविधांच्या आखणीसाठी मदत होते.
साथरोगशास्त्रीय त्रिकोण कोणत्याही आजारास फक्त विशिष्ट जीवजंतू किंवा घटक कारणीभूत असतो असे म्हणता येणार नाही. उदा. क्षयरोगजंतूची लागण झालेल्या सर्व लोकांना क्षयरोग होईलच असे नाही. रोग होणे किंवा न होणे हे रोगकारक घटका व्यतिरिक्त व्यक्तीची प्रतिकार शक्ती व बाह्य पर्यावरणातील घटकावर सुध्दा अवलंबून असते. कारक, यजमान व पर्यावरण हे तीन घटक कोणत्याही रोगाच्या प्रसारास आवश्यक असतात या तीन घटकांना एकत्रितपणे साथरोगशास्त्रीय त्रिकोण" असे संबोधण्यात येते. या तीनपैकी एक जरी घटक नसेल तरी रोग होणार नाही. रोग उत्पन्न होण्याकरिता हया तीन घटकात परस्पर क्रिया होणे हे आवश्यक आहे. संसर्गजन्य रोगाच्या प्रसारास कारणीभूत घटक :
अ) कारक:
कोणताही रोग होण्याकरिता रोगकारक घटकांची आवश्यकता असते. रोगकारक घटक सजीव अथवा निर्जीव असू शकतात. रोगकारक घटकांना ढोबळमानाने पाच गटात वर्गीकृत केले जाते
१. जैविक उदा. विषाण, जिवाणू, बुरशी, परजीवी जंतू इ. २. आहारातील घटक प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्वे, क्षार आणि पाणी हया घटकांचे वाजवी पेक्षा जास्त, कमी किंवा असंतुलित प्रमाणामुळे उद्भवणारे आजार होतात.. ३. भौतिक घटक यात उष्णता, थंडी, दाव, किरणोत्सर्ग, विद्युत यांचा समावेश होतो. ४.रासायनिक घटक – यात धातू उदा. हिशे, धूर, धूळ, वायू इत्यादीचा समावेश होतो. ५. यांत्रिक घटक घर्पण आणि इतर यांत्रिक बलामुळे जखमा, इजा, अस्थिभंग इ .
ब) यजमान :
यजमानाशी संबंधित घटक खालील प्रमाणे आहेत.
१ . वय काही आजार ठराविक वयोगटातील व्यक्तीना होतात. उदा. लहान मुलांना
गोवर, प्रौढ व्यक्तींना कर्करोग इ.
२. लिंग : काही आजार स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात, तर काही पुरुपात.
उदा. स्त्रियामध्ये मधुमेहाचे तर पुरुषामध्ये •दयरोगाचे प्रमाण जास्त आढळते. ३. अनुवंशिकता: काही आजार शरीरातील अपायकारक जनुकामुळे होतात. उदा. हिमोफीलीया, रंग आंधळेपणा, अल्बिनिझम इ.
४. आहारः असंतुलित व अपुऱ्या आहारामुळे पोषणविषयक अनेक आजार उद्भवतात.
उदा. झुरणी, रक्तक्षय, स्थूलत्व इ.
५. व्यवसाय: काही आजार व्यवसायोत्पन्न असतात. उदा. शिसे विषबाधा ६.रुढी आणि चालीरीती : बऱ्याचदा रुढी/चालीरीतीमुळे रोगप्रसार होऊ शकतो. उदा. उघडयावर शौच करण्याच्या रितीमुळे अंकुशकृमीचा तसेच डोळयात काजळ लावण्याच्या पध्दतीमुळे डोळयाचा जंतूसंसर्ग होऊ शकतो.
७. मानवी वर्तनः व्यायामाचा अभाव, मद्यपान, धूम्रपानामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो.