१. अखंड मानवी शरीर (Body as an integrated whole)
पूर्ण मानवी शरीर हे असंख्य पेशी (Cell) पासून बनलेले आहे. पेशी म्हणजे सजीव शरीराच्या मूलभूत घटक (Fundamental unit of life) शरीरात समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहाला पेशीजाल (Tissues) म्हणतात. हया पेशीजालापासून शरीराचे वेगवेगळे अवयव (Organs) तयार होतात आणि हया अवयवांपासून वेगवेगळ्या अवयवसंस्था (Systems) तयार होतात. सर्व संस्था मिळून पूर्ण शरीर तयार होते. जरी शरीराच्या अभ्यासाकरिता वेगवेगळ्या अवयव संस्थाचे वर्णन आपण बघतो तरी हया विविध संस्था एकमेकांच्या मदतीने अखंडपणे कार्यरत असतात. एका संस्थेला होणा-या आजाराचा परिणाम दुस-या संस्थेवर आणि पर्यायाने संपूर्ण शरीरावर दिसून येतो.
अखंड मानवी शरीर (Body as an integrated whole) |
मानवी शरीर व अवयव
शरीराच्या सुरळीत कार्यासाठी सर्व अवयवांत योग्य समन्वय साधणे आवश्यक
असते. मानवी शरीराचा अभ्यास दोन पध्दतीने करता येतो.
१) शरीराचे विविध अवयवेः-
उदा. डोके व मान, छाती व छाती पोकळी, उदरपोकळी, हात, पाय, कान, डोळे इ. प्रत्येक भागाचा वेगवेगळा अभ्यास करता येतो.
२) शरीरातील विविध संस्था:-
उदा अस्थिसंस्था, स्नायुसंस्था, अभिसरण संस्था, श्वसनसंस्था, पचनसंस्था, मज्जासंस्था, लससंस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, नलिकाविहिन ग्रंथी व विशिष्ट संवेदनेचे अवयव.
मानव शरीर निर्मिती (Development of Human Body) :- स्त्रीबीजाचे (Ovum) शुक्राणु (Sperm) व्दारे फलन होऊन निर्माण झालेल्या फलीत पेशीचे सतत
विभाजन होऊन त्यांचे आंतर, मध्य व बाहय थर निर्माण होतात. या तीन थरांपासून चार प्रकारचे पेशीजाल व या पेशीजालापासून इंद्रिय संस्था व भृणाचा विकास गर्भाशयात होतो.