३. गालफुगी (Mumps)
रोगाचे स्वरुप :
विषाणूमुळे होणारा हा एक तीव्र संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे एकीकडील अथवा दोन्हीकडील लाळ ग्रंथीना (Parotid glands) सूज येऊन त्याचा दाह होणे. हा रोग जगात सर्वत्र आढळतो. हा रोग वर्षभर थोड्याफार प्रमाणात होत असला तरी हिवाळ्यात हा रोग साथीच्या प्रमाणात उद्भवतो.
गालफुगी (Mumps) galgund
साथरोग शास्त्रीय घटक :
कारक:
मिक्झो व्हायरस पॅरोटिडायटिस
संसर्गस्त्रोत :
गालफुगीचा त्रास असलेले व अनिदानात्मक लक्षणे असलेले रुग्ण.
संसर्गक्षम काळ :
रोग लक्षणे सुरु होण्याच्या ६ दिवस आधीपासून ते लाळग्रंथीची सूज ओसरेपर्यंतच्या कालावधी करिता रुग्ण संसर्गक्षम असतो..
वयोगट :
: ५ ते १५ वर्षे वयातील मुलामुलीत हया रोगाचे प्रमाण जास्त असते.
प्रसार पध्दत :
लाळ व श्वसन मार्गातील स्त्रावांच्या तुषारामार्फत हे जंतू रोगक्षम व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात.
प्रतिकार क्षमता :
विषाणू संसर्ग झाल्यानंतर निर्माण होणारी प्रतिकारशक्ती साधारणतः
आयुष्यभर टिकते. तरीही क्वचित प्रसंगी हा रोग पुन्हा होऊ शकतो.
अधिशयन काळ :
२ ते ३ आठवडे.
रोग लक्षणे :
पू नसलेली एक किंवा दोन्ही लाळग्रंथीची सूज, कान दुखणे, तोंड उघडता
न येणे, ताप येणे, डोकेदुखी
गुंतागुंत :
गालफुगीमुळे इतर अवयवांवर परिणाम होऊन वृषण, रजपिंड व स्वादुपिंड दाह होऊ शकतो.
संदर्भसेवा:
वरील प्रकारची गुंतागुंत आढळल्यास रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवावे.
उपचार :
१. ताप व वेदनाकरिता पॅरासिटॅमॉल व वेदनाशामक औषध देणे.
२. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे.
३. तोंडाची व दातांची स्वच्छता राखणे.
४. रुग्णास विश्रांती देणे.
५ .अलगीकरण : रोगाचा प्रसार थांबविण्याकरिता
रुग्णास इतर मुलांच्या संपर्कात येवू न देणे.
लाळग्रंथीची सूज ओसरेपर्यंत
६. निर्जंतुकीकरण : रुग्णानी वापरलेल्या वस्तूचे निर्जंतुकीकरण करणे.
प्रतिबंधन :
गालफुगी या रोगाचा प्रतिबंध करता येऊ शकतो. या रोगाविरुध्द जिवंत व निष्क्रिय विषाणू असलेली लस उपलब्ध आहे. ही लस कातडीच्या खाली ०.५ मिली इतक्या मात्रेत टोचतात. एका मात्रेपासून किमान आठ वर्षासाठी प्रतिकारशक्ती मिळते.