पेशी (Cell):
मानवी शरीराचा प्रत्येक अवयव / भाग कित्येक सूक्ष्म पेशींचा बनलेला असतो.
शरीराच्या अतिसूक्ष्म जिवंत व क्रियाशील घटकांना पेशी असे म्हणतात. पेशींच्या कार्यानुसार व अवयवानुसार पेशींचा आकार वेगवेगळा असतो. प्रत्येक पेशी सजीव, रंगहीन, अर्धप्रवाही जेलीसारख्या पेशी द्रवाने (Cytoplasm) तयार झालेली असते.
पेशीद्रवात पाणी, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोदके, क्षार असतात.
पेशींचा केंद्रभाग धाग्यासारखा असून प्रथिने व डी. एन. ए.ने तयार झालेले असते. हया धाग्यासारख्या भागानांच गुणसूत्रे (Chromosomes) म्हणतात. गुणसूत्रांवर जनुक (Genes) असतात. त्यांची रचना विशिष्ट असते.
पेशी विभाजनाच्या वेळेस गुणसूत्रे व जनुक लांबट होऊन विभागल्या जातात व अशा त-हेने नवीन पेशीला गुणसूत्रे, जनुक त्याच विशिष्ट रचनेत प्राप्त होतात..
गुणसूत्रावर असणा-या जनुकमुळेच आईवडिलांकडील अनुवंशिक गुणधर्म अपत्याकडे येतात. उदा. शरीराचा बांधा, बुध्दिमत्ता, डोळयांचा रंग, केस, त्वचेचा रंग इ. प्रत्येक पेशीत गुणसूत्राच्या २३ जोडया असतात. त्यापैकी
१) जोडी लिंगविशिष्ट असते. पुरुषांमध्ये ही जोडी क्ष-य (X-Y) आणि स्त्रियांमध्ये क्ष-क्ष (X-X) असून अपत्याचे लिंग हे पुरुषाच्या लिंगविशिष्ट गुणसूत्रावर अवलंबून असते.