२. गोवर (Measles)
रोगाचे स्वरुप :
विषाणूमुळे होणारा अति महत्वाचा संसर्गजन्य आजारआहे.
हा आजार प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळतो. गोवराची प्रमुख लक्षणे म्हणजे ताप, खोकला, शिंका येणे, नाक वाहणे आणि अंगावर पुरळ येणे ही होय. भौगोलिक स्थिती : हा रोग जगात सर्वत्र आढळतो. भारतात हया रोगामुळे बरीचशी लहान मुले मृत्यूमुखी पडतात. दवाखान्यात दाखल केलेल्या गोवराच्या रुग्णात मृत्यूचे प्रमाण साधारणतः १.८ ते ७.६ टक्के इतके आढळते. भारतात गोवरची साथ साधारणतः जानेवारी ते एप्रिल या काळात येते.
गोवर (Measles
साथरोगशास्त्रीय घटक :
कारक :
पॅरामिक्झो विषाणू
संसर्ग स्त्रोत :
गोवरचा रुग्ण
संसर्गक्षम कालावधी :
अंगावर पुरळ उठण्याआधी ४ दिवस ते पुरळ उठल्यानंतर ५:दिवस असा ९ दिवसाच्या कालावधीत गोवरचा रुग्ण संसर्गक्षम असून सुरवातीचा कालखंड जास्त संसर्गक्षम असतो. वयोगट : गोवर हा लहान मुलांना होणारा आजार आहे. मातेकडून हया रोगाविरुध्द मिळालेली प्रतिकारशक्ती साधारणतः ९ महिन्यापर्यंत टिकते व त्यामुळे हया ९
महिन्यापर्यंत बाळाला गोवरची क्वचितच लागण होते.
लिंग :
हा रोग मुलामुलीत समान प्रमाणात आढळतो.
रोगप्रतिकार क्षमता :
गोवर रोगापासून मिळणारी प्रतिकारशक्ती आयुष्यभर टिकते, त्यामुळे हा रोग एकदा झाला की पुन्हा क्वचितच होतो.
रोगप्रसार :
रुग्णाच्या नाक व घशातील स्त्रावाचे तुषार उडून हया रोगाचा प्रसार होतो. रुग्णाच्या संसर्गजन्य स्त्रावाने दूषित झालेल्या वस्तूच्या उदा. कप, चमचे, पेन्सिल इ. वापरामुळे देखील हा रोग होऊ शकतो.
अधिशयन काळ : १० ते १४ दिवस,
रोगलक्षणे :
१. पूरळ पूर्व अवस्था (Pre-eruptive stage ): ताप येणे, नाक वाहणे, डोळे लाल होणे व त्यातून पाणी गळणे, शिंका येणे इ. वासामुळे लहान मुले फार केविलवाणे दिसतात. गालाच्या आतल्या श्लेष्मल पटलावर पुरळपूर्व काळात येणा-या निळसर पांढुरक्या बिंदूंना कॉप्लिकचे बिंदू असे संबोधले जाते. बिंदू भोवतालचा भाग लालसर असतो. ८० टक्के रुग्णात हे कॉप्लिकचे बिंदू आढळतात. त्यावरुन रोगाचे खात्रीचे निदान करता येते. रोग लक्षणपूर्वक काळातील शारीरिक त्रास तीन ते चार दिवस टिकतो. २. पुरळ अवस्था (Eruptive stage ) :- आजारपणाच्या साधारणतः चौथ्या दिवशी विशिष्ट स्वरुपाची गडद लाल रंगाची कातडीसपाट पुरळ उठते. सर्वप्रथम चेहरा व कानाच्या मागे मानेवर पुरळ येतात व त्यानंतर खाली-खाली सरकत जाऊन सर्व शरीरभर पसरतात. पुरळ पायापर्यंत पसरण्यासाठी साधारणतः दोन ते तीन दिवस लागतात. पुरळ ५ ते ६ दिवसानंतर हळुहळू कमी होऊन त्वचेवर गडद डाग राहतात.
३. पुरळपश्चात अवस्था (Post-eruptive stage ):- या रोगात बालकाच्या वजनात झालेली घट बराच काळ टिकते. तसेच बालकाला जंतूसंसर्ग, वाढ खुंटणे, अतिसार, बुरशीजन्य आजार सुध्दा होऊ शकतात. गुंतागुंत : लहान मुलांमध्ये विशेषतः कुपोषित मुलांमध्ये गोवर प्राणघातक ठरु शकतो. हया आजारात अतिसार, श्वासनलिका दाह, फुफ्फुसदाह किंवा मेंदुदाह या सारखी
गुंतागुंत होऊन मृत्यू येऊ शकतो. हयाच कारणाने गोवरचे प्रतिबंधन करणे अत्यंत आवश्यक आहे.
संदर्भसेवाः वरील प्रकारची गुंतागुंत आढळल्यास रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवावे.
औषधोपचार व नियंत्रण :
७.रुग्णाच्या नाक व घशातील स्त्रावाचे तसेच त्याने दुषित झालेल्या वस्तुंचे निर्जंतुकीकरण करा.
८.रुग्णाला वयोगटानुसार उपचारात्मक जीवनसत्व "अ" दयावे.
प्रतिबंधन लसीकरणाव्दारे :
गोवर लस ही जिवंत पण निष्क्रीय केलेल्या विषाणूपासून तयार करतात. राष्ट्रीय
लसीकरण वेळापत्रकानुसार लहान मुलांना ९ ते १२ महिने या वयात ही लस दिली गेली पाहिजे. ही लस ०.५ मि.ली. मात्रेत त्वचेखाली देतात. हया एका मात्रेमुळे बालकांना कमीत कमी १५ वर्षे पर्यंत ९५ टक्के प्रमाणात संरक्षण मिळते.
गोवर रोगाविषयी समाजाला खालील प्रमाणे सल्ला द्या :
१. गोवर हा तीव्र स्वरु चा आजार असून त्यापासून उद्भवणाऱ्या गुंतागुंतीमुळे मुले दगावण्याची संभावना असते.
2. गोवरपासून संरक्षणाकरिता लसीकरणाची आवश्यकता असून ही लस मोफत
उपलब्ध आहे.
३.गोवर झालेल्या मुलाला घरीच पण इतरांपासून दूर ठेवा.