आहार संस्कृ ती
भारतीय संस्कृ ती ही विविध तेने नटलेली संस्कृ ती
म्हणून ओळखली जाते. ही विविध ता राहणीमान,
पोशाख, प्रथा, देवता, उपासना यांमध्ये तर दिसतेच पण
त्या त्या प्रदेशाच्या आहारामध्येसुद्धा दिसून येते.
मुळातच भारतीय आहार विचारधारेला आपल्या पूर्व जांनी
सातत्याने केलेल्या विचारमंथनाची शास्त्रीय बैठक आहे.
आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणाशी
आपल्या शरीराला जुळवून घ्यावे लागते. भारतीय
उपखंडामध्ये प्राद ेशि क वातावरणात कमालीची तफावत
आढळते. काश्मी र, हि माचल प्रदेशात अत्यंत थंडी तर
केरळ, कन्याकुमारी प्रदेशात कमालीचे दमट हवामान. या
अशा प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या असलेल्या हवामानाशी
जुळवून घेणाऱ्या आहाराचा विचार प्रत्येक राज्यात
केला गेला आणि यातूनच आहार संस्कृ तीचा जन्म झाला.