पेशीचे पुनरुत्पादन -दोन पध्दतीने होते.
१. द्विभाजन पध्दती -
पेशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर तिचे विभाजन होऊन दोन बाळपेशी तयार होतात. यामुळे नवीन पेशी तयार होऊन निकामी जीर्ण झालेल्या व रोगामुळे नष्ट झालेल्या पेशींची भरपाई होते.
२. संयोगी पध्दती - लिंग पेशींची पुनर्निर्मिती यापध्दतीने होते. पूर्ण वाढीच्या स्त्रीबीजाचा व पुरुष बीजाचा संयोग झाल्यानंतर एक मानव पेशी तयार होते. स्त्रीबीजातील रंगसूत्रामधून मातेचे व पुरुष बीजातील रंगसूत्रामधून पित्याचे गुणधर्म बालकात येतात.
पेशींचे कार्य -
१. हालचाल (Motion/movement)- आदिजीवसदृश हालचाल उदा. श्वेतपेशी
केशचलन हालचाल उदा. आच्छादक पेशी
२. उत्तेजितता (Irratibility) भौतिक, रासायनिक किंवा यांत्रिक. ३. अभिसरण (Circulation) - अन्नघटक आत घेणे, टाकावू पदार्थ बाहेर टाकणे.
४. श्वसन (Respiration) प्राणवायूच्या साहयाने उष्णता निर्माण करणे.
५. अभिशोषण (absorption) अत्यावश्यक पदार्थांचे शोषण करणे. ६. उत्सर्जन (Excretion)- युरिया, युरिक अॅसिड बाहेर टाकणे.
७. स्त्रवण (secretion) - दुग्धग्रंथी, नलिकाविहीन ग्रंथींचे स्त्राव.
८. शरीराची वाढ व झीज भरुन काढणे (repair) जीवनावश्यक निरंतर प्रक्रिया.
९. पुनरुत्पादन (Mitosis) मृतपेशींची उणीव भरून काढण्यासाठी आवश्यक. - वृषण, हृदय, चेतापेशी मूत्रपिंड या अवयवांचा अपवाद सोडता इतर सर्व पेशी पुनरुत्पादन करतात.
cell-regeneration-cell-division-peshi-karya-function-of-cells-in-marathi