२. अस्थिसंस्था (Skeletal system )
मानवी सांगाडा हा हाडांनी व कूर्व्यांनी बनलेला असून शरीरात एकूण २०६ हाडे असतात. हाडे ही संयोगी पेशीजालाचा प्रकार असून इतर पेशींपेक्षा या पेशी जालामध्ये कॅलशियम आणि फॉस्फरस या क्षारांचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडे टणक असतात. त्यामुळे शरीराला आकार मिळतो व नाजुक अवयवांचे संरक्षण होते.
हाडांचे प्रकार आकारावरुन हाडांचे ४ प्रकार होतात.
१. लांब हाडे (Long Bones)
२. आखूड हाडे (Short Bones )
३. चपटी हाडे (Flat Bones )
४. अनियमित हाडे ( Irregular Bones )
skeletal-system-asthisanstha-hadache-parkar